बेळगाव तालुक्यातील येळ्ळूरजवळील राजहंस गडावर फोटोशूटला गेलेल्या ७ युवकांपैकी दोघांचा गडाजवळील क्वारीच्या तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली.

राजहंसगडावर फोटोशूट करण्यासाठी ७ मित्र आज गेले होते. फोटोशूट संपवून येताना गडाजवळील क्वारीच्या तळ्यात साचलेल्या पाण्यात पोहण्याची त्यातील दोघांची इच्छा झाली. त्यामुळे ते पोहण्यासाठी तळ्यात उतरले. मात्र बराचवेळ ते वर आले नाहीत. मृतांपैकी एक युवक के. के. कोप्प गावचा तर दुसरा हिंदवाडी येथील रहिवाशी असल्याचे समजते. त्यांच्याबाबत अधिक तपशील यायचा आहे. घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन बुडालेल्या युवकांचा शोध सुरु केला आहे.
Recent Comments