Belagavi

प्रा. एस. एम. गौडर यांच्यावरील अभिनंदन ग्रंथाचे प्रकाशन

Share

 अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे कन्नड प्रा. एस. एम. गौडर यांच्यावरील अभिनंदन ग्रंथाचे त्यांच्या शिष्य वर्गातर्फे रविवारी बेळगावात प्रकाशन करण्यात आले.

बेळगावातील कॅम्पमधील गंगाधर शानभाग सभागृहात रविवारी झालेल्या समारंभात  प्रा. एस. एम. गौडर यांच्यावरील अभिनंदन ग्रंथाचे प्रकाशन अथणीच्या मोटगीमठाचे श्री प्रभूचन्नबसव महास्वामी आणि हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे हारुगेरीच्या चन्नवृषभेन्द्र कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. माळी म्हणाले, प्रा. एस. एम. गौडर वरून कठोर वाटत असले तरी त्यांची शिकवण्याची पद्धत सहजसोपी होती. तेंव्हाच्या आणि आताच्या अध्यापन पद्धतीत बराच फरक आहे. आज विध्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून काय शिकतात हे पालकांनाही माहित होत नाही.

यावेळी सीपीआय आय. एस. गुरुनाथ म्हणाले, प्रा. गौडर यांच्या मुळेच आम्हाला कन्नड विषयाची गोडी लागली. त्यांच्या शिकवण्यामुळेच आज मी पोलीस अधिकारी म्हणून जनतेची सेवा करत आहे. याप्रसंगी प्रा. एस. एम. गौडर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी लिंगराज कॉलेजचे निवृत्त प्राचार्य प्रा. एम. एस. इंचल होते. अभिनंदन ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. अशोक नरोडे यांच्यासह प्रा. गौडर यांचे अनेक विध्यार्थी यावेळी उपस्थित होते. नयना गिरीगौडर आणि सहकाऱ्यांनी वचन गायन आणि भक्तीगीत गायन सादर केले.

 

 

 

Tags: