मधुर संगीताच्या तालावर थिरकत फ्लड लाईट्सच्या झोतात मादक कॅट वॉक करत येणाऱ्या मॉडेल्स, आकर्षक डिझाईन्सच्या वस्त्र प्रावरणांचे एकाहून एक सरस सादरीकरण अशा वातावरणात बेळगावकरांचा विकेंड एकदम कलरफुल झाला.

होय, केएलई संस्थेच्या फॅशन टेकनॉलॉजि अँड अप्पेरल्स डिझाइन्स वुमेन कॉलेजच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी साकारलेल्या फॅशन शोमध्ये सर्वच उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. केएलई शताब्दी सभागृहात आयोजित या फॅशन शोमध्ये विद्यार्थिनींनी आपापल्या संकल्पनेतून साकारलेल्या वस्त्र प्रावरणांचे एकाहून एक सरस सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे महानगरांच्या तुलनेत बेळगाव कुठे कसे कमी आहे असा प्रश्न पडला. ‘विन्यास-२०२१’ या फॅशन शोचे उदघाटन पहिली मिस प्रिन्सेस इंडिया स्नेहल बिर्जे यांनी केले. कमनीय बांध्याच्या एकाहून एक सुंदर ३१ मॉडेल्सनी या फॅशन शोमध्ये कॅट वॉक करत आकर्षक डिझाईन्सच्या वस्त्र प्रावरणांचे सादरीकरण केले. 
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना केएलई संस्थेच्या फॅशन टेकनॉलॉजि अँड अप्पेरल्स डिझाइन्स वुमेन कॉलेजच्या प्राचार्या वेदश्री के. म्हणाल्या, आमच्या संस्थेत केवळ परीक्षा आणि मार्क्सपुरतेच शिक्षण दिले जात नाही, तर फॅशन इंडस्ट्रीच्या मागणीनुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित नवनव्या डिझाईन्सचे प्रशिक्षण दिले जाते. संशोधनातून संकल्पना साकारण्यावर भर दिला जातो.
या फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सनी ‘आपली मराठी’सोबत त्यांचे निभाव कथन करून हर्ष व्यक्त केला. बाईट+बाईट
एकंदर, या फॅशन शोमुळे बेळ्गावकरांचा विकेंड कलरफुल झाला. फॅशनच्या विश्वातही बेळगाव कुठे मागे नाही हेच या शोने दाखवून दिले.


Recent Comments