
बेळगावातील गुलमोहर बाग या चित्रकारांच्या संस्थेच्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ व्हॅक्सिन डेपो‘ या चित्रकृती प्रदर्शन कार्यक्रमात आयोजक आणि व्हॅक्सिन डेपो विकास समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक रण माजल्याची घटना शनिवारी घडली.

होय, बेळगावचे फुफ्फुस मानले जाणाऱ्या टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपोत पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी विकासकामांना विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गुलमोहर बाग या चित्रकारांच्या संस्थेने टिळकवाडीतील वरेरकर नाट्यसंघाच्या चित्रमहर्षी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीत ‘ग्लिम्प्सेस ऑफ व्हॅक्सिन डेपो’ या व्हॅक्सिन डेपोवर आधारित पेंटींग्स प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी चित्रकार आणि व्हॅक्सिन डेपो विकास समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली. कार्यकर्त्यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाला हरकत घेत, केवळ सकाळी १ तास फिरण्यासाठी उच्चभ्रू लोकांना व्हॅक्सिन डेपो पाहिजे, त्यानंतर त्यांना याचे काही देणेघेणे नसते.

सायंकाळनंतर डेपोत अनैतिक, बेकायदेशीर कृत्ये चालतात असा आरोप केला. त्यावर चित्रकारांनी, आम्ही पर्यावरण रक्षणासाठी व्हॅक्सिन डेपोचे संवर्धन व्हावे या उद्देशाने प्रदर्शन आयोजित केले आहे असे उत्तर दिले.


Recent Comments