कर्ज काढून आयपीएल क्रिकेटवर बेटींग लावून हरल्याने निराश झालेल्या फळविक्रेत्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील कातरकी येथे घडली.

होय, मटका, जुगार, बेटींग हे नाद कोणालाही परवडणारे नाहीत हे नव्याने सिद्ध करणारी घटना घडली आहे. ३८ वर्षीय सय्यद बाळद असे आत्महत्या केल्याचे नाव असून तो व्यवसायाने फळविक्रेते होता. त्याने आयपीएल क्रिकेटवर बेटींग लावण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले होते असे समजते. ते कर्ज फेडता न आल्याने त्याने कातरकी पुलाजवळ नदीत उडी घेऊन जीव दिल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्याच्या मृतदेहाचा शोध सुरु केला आहे.


Recent Comments