शिमोगा येथे झालेल्या राज्यस्तरीय दसरा कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या कराटेपटूंनी स्पृहणीय यश संपादन केले आहे.

कर्नाटक सरकार म्हैसूर दसरा समिती आणि शिमोगा जिल्हा कराटे असोसिएशनच्या वतीने शिमोगा येथे १० व ११ ऑक्टोबररोजी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यातील सुमारे ५०० कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यात बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या कराटेपटूंनी भाग घेऊन विविध प्रकारांत व गटात स्पृहणीय यश संपादन केले आहे. या कराटेपटूंचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरव करण्यात आला. या कराटेपटूंना बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, सचिव जितेंद्र काकतीकर तसेच रमेश अलगुडेकर, अक्षय परमोजी, विठ्ठल बोजगार, परशुराम काकतीकर, विनायक दंडकर, निलेश गुरका, हरीश सोलनार, नताशा अष्टेकर आदींचे मार्गदर्शन लाभले.


Recent Comments