अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिचे दागिने चोरणाऱ्या एका नराधमाला मुद्देबिहाळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजापूर जिल्ह्यातील तंगडगी गावात ही घटना घडली आहे.

३२ वर्षीय शिवय्या जंबय्या रुद्रस्वामीमठ याला बालिकेवर अत्याचारप्रकरणी मुद्देबिहाळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. मंगळवारी सकाळी ही बालिका प्रातःविधीसाठी गेली असता आरोपी शिवय्याने तिचे मित्रांच्या मदतीने अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेऊन पोबारा केला होता. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केला होता.
सायंकाळी उशिरा ती घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुद्देबिहाळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिवाययला अटक केली. त्याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments