Belagavi

श्री जोतिबा मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विशेष पूजा

Share

 बेळगावातील शिवबसव नगरातील श्री जोतिबा मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, विशेष पूजा आयोजित केली होती.

चव्हाट गल्लीसह बेळगावातील श्री जोतिबा भक्तांनी शिवबसव नगरात अनेक कुटुंबांचे कुलदैवत असलेल्या श्री जोतिबा देवाचे भव्य मंदिर शिवबसवनगरात उभारले आहे. तेथे नवरात्रात अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदाही नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि विशेष पूजा आयोजित केली होती. दख्खनच्या राजाची श्रीकृष्णावतारातील पूजा बांधण्यात आली होती. आकर्षक रोषणाईने मंदिर सजविण्यात आले होते. विशेष पूजेच्या निमित्ताने मंदिरात भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रमही झाला. यावेळी नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

विशेष पूजेनिमित्त भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. जोतिबा मंदिर समितीचे अध्यक्ष ऍड. अमर येळ्ळूरकर, पुजारी लक्ष्मण बुने, मयुरेश गोडसे, प्रताप ठक, साईश, राहुल अष्टेकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

Tags: