Belagavi

बेळगावात पोलीस शस्त्रागारात आयुधपूजा

Share

खंडेनवमीनिमित्त बेळगावातील पोलीस शस्त्रागारात गुरुवारी आयुधपूजा करण्यात आली.

हिंदू धर्मात नवरात्रौत्सवाला मोठे महत्व आहे. देशभरात विविध राज्यात तेथील स्थानिक परंपरा, रिवाजानुसार नवरात्र, दसरा सण साजरा केला जातो. खंडेनवमीला आयुध पूजा करण्याची प्रथा मात्र सर्वत्र आढळते. त्याचप्रकारे बेळगावातील पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात आयुधपूजा करण्याची परंपरा ब्रिटिश काळापासून आहे. याच परंपरेनुसार पोलीस शस्त्रागारात गुरुवारी आयुधपूजा करण्यात आली.

पोलीस मुख्यालयाच्या आवारात दुर्गामूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलिसांची शास्त्रे आणि वाहनांची पूजा करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस दलाचे प्रमुख वाय. के. काशप्पनावर, सी. ए. आर. एसपी एस. वाय. पाटील, आरपीआय बारद, तावरेप्पा, मठद, कोकटनूर, के. ए. गंजी, शिवानंद गुंजाळ, एसीपी चंद्रप्पा आदी उपस्थित होते.  यावेळी समस्त जनतेला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

Tags: