Belagavi

आरसीयु कुलगुरूंच्या विरोधात उच्च शिक्षणमंत्र्यांना निवेदन

Share

राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरूंच्या विध्यार्थी विरोधी धोरणाचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अभाविपतर्फे बेळगाव दौऱ्यावर आलेल्या उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण याना देण्यात आले.

आरसीयु कुलगुरूंच्या धोरणामुळे गरीब विध्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येत आहे. त्यांनी दंडरहित प्रवेशाचा कालावधी कमी ठेऊन दंडसहित प्रवेशाचा कालावधी वाढवून ठेवला आहे. शिवाय प्रवेशाच्या दंड शुल्कातही जबर वाढ केली आहे. विद्यापीठांनी अशाप्रकारे पैसे कमावण्याचा धंदा केल्याने गरीब विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्याशिवाय दिवसागणिक नवनवी परिपत्रके जारी करून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे.

गुणपत्रिकांसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारूनही सुमार दर्जाच्या गुणपत्रिका देण्यात येत असल्याने आरसीयूमधील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यापीठाच्या या धोरणामुळे या भागातील गरीब विध्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरसीयूमधील गैरप्रकार थांबवून विध्यार्थ्यांना न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण याना देण्यात आले.

याप्रसंगी अभाविप जिल्हा संघटन सचिव सुरेश जंगोनी, शहर सचिव किरण दुकानदार, ऋषभ कुलीण्णावर, प्रशांत, शिवू बिज्जरगी, संदीप दंडीगल, कार्तिक केरणी, श्रीकांत लमाणी आदी उपस्थित होते.

 

 

Tags: