सध्या सर्वत्र दसरोत्सवाची धामधूम सुरु असून आज दुर्गाष्टमी साजरी होत आहे. दुर्गाष्टमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्राणीबळी दिला जातो. परंतु मंदिराच्या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने प्राणीबळी देऊ नका, मंदिरांचे दिव्यालय बनवा वधालय नको असे आवाहन विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री द्यानंद स्वामी यांनी केले.

: विश्व प्राणी कल्याण मंडळ, राष्ट्रीय बसव दल, लिंगायत संघटना आणि जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री दयानंद स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ”अहिंसा प्राणी द्या संदेश यात्रेला’ बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या संदेश यात्रेला चालना दिली. यावेळी श्री दयानंद स्वामीजी यांनी सदर आवाहन केले. 
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सणानिमित्त अनेक प्राणी पक्षांचे बळी दिले जातात. सणाचे निमित्त करून दिल्या जाणाऱ्या या बळीचे प्रमाण थांबावे हा स्वामींनी दिलेला संदेश योग्य असल्याचे ते जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले कोणत्याही यात्रेत, सण – समारंभात तसेच धार्मिक स्थळी प्राणी पक्षांचे बळी दिले जाऊ नयेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. शिवाय खानापूर तालुक्यातील कक्केरी येथे दसऱ्यानिमित्त होणाऱ्या बिष्टादेवीं यात्रेत पशुबळीची प्रथा आहे, परंतु गुरुवारी बिष्टा देवी मंदिर किंवा कक्केरी गावच्या हद्दीत पशुबळीला बंदी घालण्याचा आदेश आपण बजाविला आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
यानंतर बोलताना श्री दयानंद स्वामीजी यांनी कक्केरी गावातील प्रथेबद्दल सांगितले. विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी कक्केरीत शस्त्रांची पूजा करण्यात येते. त्यानंतर मध्यरात्री हजारो प्राण्यांचा बळी दिला जातो. सर्वत्र प्राण्यांचे रक्त वहात असते. कक्केरी येथील उत्सवाला कसाई खाना बनविला जातो. कायद्यानुसार प्राण्यांची हत्या करणे हा गंभीर गुन्हा आहे. अहिंसेच्या मार्गाने ही यात्रा करून उत्सवावेळी कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जाऊ नये, अनिष्ट प्रथा पाळू नयेत, असे आवाहन श्री दयानंद स्वामींनी केले.
दयानंद स्वामी पुढे म्हणाले, आम्ही अनेकवेळा अशा प्राण्यांचे बळी रोखले आहेत. विश्व प्राणी कल्याण मंडळ आणि इतर संस्था आयोजित ”अहिंसा प्राणी द्या संदेश यात्रा” खानापूर, कक्केरी, अळणावर यासह अनेक ठिकाणी संचार करणार आहे. आयुध नवमीदिवशी होणारे प्राणी बळी रोखण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. मुक्या प्राण्यांनाही जीवन आहे. त्यांना जगण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचाही आदर करून मुक्या जनावरांशी प्रेमाने वागले पाहिजे, असे आवाहन स्वामीजींनी केले.


Recent Comments