भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अमित शिवाजी चिंगळे यांना एनएनएसचा राज्यस्तरीय पूरस्कार देण्यात आला. बंगळूर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ.सी एन अश्वथ नारायण, क्रीडा मंत्री डॉ. के सी नारायण गौडा आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्यावतीने प्रा. डॉ. अमित चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी स्वच्छता, आरोग्य शिबीरे भरवून प्रबोधन करण्यात आले. विशेष करून ग्रामीण भागात जागृती करण्यात आली. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी एन मिसळे यांच्या सोबत डॉ. चिंगळी यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी आम. रिजवाण हर्षद,
निम्हसचे संचालक डॉ. प्रतिमा मूर्ती, डॉ. शंकर नारायण राव, व्हिटीयुचे कुलगुरू प्रा. करिसिद्धप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments