Khanapur

आ. डॉ. अंजली निंबाळकरांनी भरली दुर्गामातेची ओटी !

Share

खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावात नवरात्रौत्सवानिमित्त श्री दुर्गामातेची ओटी भरण्याच्या कार्यक्रमात . डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाग घेऊन देवीची पूजा केली.

होय, प्रतिवर्षाप्रमाणे खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावात नवरात्रौत्सवानिमित्त श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. उत्सव मंडपात खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी भाग घेऊन देवीची पूजा करून ओटी भरली. यावेळी त्यांनी गावातली निवृत्त शिक्षक आणि वारकऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी गावातील मंदिर ट्रस्टची नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांना केले. जर नोंदणी नसेल तर मंदिराला आमदार निधीतून अनुदान मंजूर करता येत नाही. तरीही एक वर्षाच्या आत मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्याशिवाय या भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून शिक्षक नेमण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.

 

Tags: