चार आणायला शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे.

होय, खानापूर तालुक्यातील चिक्कदिनकोप्प गावातील एका शेतकऱ्याचा जनावरांसाठी शेतात चार आणायला गेला असता, विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ५२ वर्षीय महावीर शिवप्पा मल्लनावर असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या २ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतावरून गेलेल्या वीजवाहक तारा तुटल्या होत्या. त्यातील एक तार लोम्बकळत शेतात पडली होती. गवत कापून घरी परतणाऱ्या महावीरच्या नजरेला ही तार दिसली नाही. त्यामुळे या वीजभारीत तारेवर त्याचा पाय पडला असता विजेचा धक्का बसून तो जागीच ठार झाला. या प्रकरणाची नंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.


Recent Comments