सगळीकडेच रस्ते खराब आहेत. तेथे बस सोडता मग आमच्याच गावाला बस का नाही सोडत? असा सवाल करत खानापूर तालुक्यातील कामशिनकोप्प गावच्या युवकांनी परिवहन अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची घटना घडली.

होय, खानापूर तालुक्यातील कामशिनकोप्प गावात गेल्या दहा वर्षांपासून सार्वजनिक बससेवाच नाही. या गावातील ४० ते ५० विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी खानापूर व अन्य ठिकाणी रोज प्रवास करावा लागतो. त्यांना गावाबाहेर लांब अंतर चालत येऊन बस पकडावी लागते. ग्रामस्थांनाही बससाठी अशीच पायपीट करावी लागते. मध्यंतरीच्या काळात एकदा गावाला बस सुरु करण्यात आली होती. मात्र कोरोना काळात ती बंद करण्यात आली. आता बस सुरु करा म्हटल्यावर परिवहन मंडळाचे अधिकारी खराब रस्त्यांचे कारण देत आहेत. बसच्या मार्गावरील झाडे-झुडुपे आम्ही तोडून वाट करून देतो म्हणून सांगितल्यावरही परिवहन मंडळाचे अधिकारी ऐकत नव्हते. त्यामुळे युवक व ग्रामस्थांनी संतापून सगळीकडेच रस्ते खराब आहेत. तेथे बस सोडता मग आमच्या गावालाच बस का सोडत नाही असा सवाल करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
बस सेवेअभावी कामशिनकोप्प गावातील युवक, विध्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत. देवलत्ती ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष घालून बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


Recent Comments