Banglore

बंगळूरमध्ये प्राप्तिकर अधिकाऱ्यांचा संस्थेवर छापा

Share

राजधानी बंगळूरमध्ये प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या पथकाने आणखी छापेमारीचे सत्र सुरु केले आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या समाजमाध्यम खात्यांचे काम पाहणाऱ्या संस्थेच्या कार्यालयावर आयटी रेड पडली आहे.  

होय, मंगळवारी बेंगळुरातील नरेश अरोरा यांच्या मालकीच्या ‘डिझाईन बॉक्स’ या जाहिरात संस्थेच्या कार्यालयावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापा मारला. ही संस्था शिवकुमार यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स सांभाळत होती. शिवकुमार यांच्या निवडणूक सर्वेक्षणाची जबाबदारी या संस्थेकडे होती. मात्र गेल्याच महिन्यात शिवकुमार यांनी या संस्थेसोबतचा करार संपुष्टात आणला होता. ‘डिझाईन बॉक्स’ या जाहिरात संस्थेच्या बेंगळुरातील कावेरी जंक्शनजवळील कार्यालयावर मंगळवारी हा छापा टाकण्यात आला. बेंगळुरातील कावेरी जंक्शनजवळील बहुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर या संस्थेचे कार्यालय आहे. तेथे आज सकाळी ६.३०च्या सुमारास २ कारमधून आलेल्या प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या २ पथकांनी हा छापा मारला. एका पथकाने संस्थेची खाती असलेल्या बँकांमध्ये जाऊन संस्थेच्या व्यवहारांची माहिती घेतली. ‘डिझाईन बॉक्स’ संस्थेचे मालक नरेश अरोरा रहात असलेल्या जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमधील आलिशान रूम्सचीही आयटी अधिकाऱ्यांनी झडती घेऊन तपासणी केली.

 

 

 

Tags: