Belagavi

‘कसाप’ प्रगतीसाठी प्रभावी नेतृत्वाची गरज : शेखरगौडा मालीपाटील

Share

कन्नड प्रतिष्ठा आणि अभिमानाचे प्रतीक असलेल्या कन्नड साहित्य परिषदेच्या प्रगतीसाठी प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे मत शेखरगौडा मालीपाटील यांनी व्यक्त केले. मंगळवारी बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना शेखरगौडा मालीपाटील म्हणाले, कन्नड अभिमानाचे प्रतीक असलेल्या या संस्थेत राज्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक, संघटक, जानपद संघटना तसेच कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हा आणि तालुका घटकाचे पदाधिकाऱ्यांकडून आगामी कन्नड साहित्य परिषदेच्या राज्य अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचा आग्रह करण्यात येत असल्याचे मालीपाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मी कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील असून गेल्या तीन दशकांपासून कन्नड साहित्य आणि संस्कृती , साहित्य परिषद, शैक्षिक संस्था, सामाजिक संस्था, साहित्य शेती आणि सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थी दशेपासून साहित्य, संस्कृती चा ध्यास घेऊन लोककला जपण्यासाठी विविध संघटनांमध्ये सामील हौल अनेक संघ संस्थांची स्थापनाही केली आहे. कोप्पळ जिल्हा कन्नड साहित्य सभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वर्षे काम पहिले असून कन्नड साहित्य सभा कार्यकारी समितीच्या संघटनेमध्ये प्रतिनिधी म्हणून काम पहिले आहे. कन्नड प्रचारक म्हणून काम करत असून कन्नड साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आल्यास, माझ्या योजना सरकार आणि विविध संस्थांच्या मदतीने अंमलात आणून प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात कन्नड साहित्य भवन बांधण्याचा मानस मालीपाटील यांनी व्यक्त केला.

दरवर्षी राज्याच्या चार महसूल विभागात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलने आयोजित करणे, राज्याच्या विविध भागात उदयोन्मुख आणि तरुण लेखकांच्या कार्यशाळांचे आयोजन करणे, साहित्यिक जीवनाला आधार देणे, साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्षांचे विशिष्ट प्रकल्प हाती घेऊन कार्य करणे, दास, वचन, बाल आणि शिक्षक संमेलने आयोजित करणे यासह अनेक विविध गोष्टी कन्नड भाषेसाठी करण्याचे माझे ध्येय आहे. कन्नड साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या दुर्मिळ मूळ ग्रंथांच्या पुनर्मुद्रणसह एकूण 12 कन्नड प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टीं साकार करण्यासाठी मला निवडून द्यावे, अशी विनंती मालीपाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला विविध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि कन्नड भाषाप्रेमी उपस्थित होते..

Tags: