अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे यावेळचा ईद–ए–मिलाद सण साधेपणाने, भक्तिपूर्वक साजरा करण्याचे आवाहन मार्केट उप विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी केले.

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या नेत्यांची शांतता समितीची बैठक झाले. यावेळी एसीपी सदाशिव कट्टीमनी आणि एसीपी चंद्रप्पा यांनी मार्गदर्शन केले. येत्या २० ऑक्टोबरला असलेला प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन ईद-ए-मिलाद म्हणून मुस्लिम बांधव साजरा करणार आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे हा सण सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता.
यंदाही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसल्याने ईद-ए-मिलाद सध्या पद्धतीने साजरा करावा. कोविडमुळे राज्य सरकारने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सण-उत्सव साजरे करण्यासंदर्भात काही अटी व शर्ती घालून मार्गसूची जारी केली आहे. गल्ल्यांमध्ये मंडप उभारू नयेत, स्पिकर्स लावू नयेत. गेल्या वर्षीप्रमाणे सध्या पद्धतीनेच सण साजरा करावा असे एसीपी कट्टीमनी यांनी सांगितले. गेल्या वर्षी ११ जणांनाच प्रार्थनेची मुभा देण्यात आली होती. मात्र यावेळी १५ ते २० जणांना प्रार्थना करण्याची मुभा देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.
एकंदर, विनाकारण गर्दी करून कोरोना व्हायरसला निमंत्रण देण्याऐवजी सरकारचे नियम पाळून सावधगिरी बाळगत येणारे सगळे सण साजरे करण्याची सध्या गरज आहे.
न


Recent Comments