एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला बेड्या ठोकून त्याच्याकडून चोरलेल्या तब्बल १० मोटरसायकली जप्त करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.

मार्केट उपविभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने या मोटरसायकल चोराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ७ लाख रु किंमतीच्या १० मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. आरोपीला न्यायालयासमोर हजर करून पोलिसांनी तपास चालविला आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माळमारुती पोलिसांची प्रशंसा करून त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.


Recent Comments