विजापूर जिल्ह्यात भूकंपाची चिंता संपण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मूळवाड गावात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले असून आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सातत्याने भूकंपाचे धक्के अनुभवणारे मूळवाड ग्रामस्थ बिथरले आहेत. काल पहाटे ५ च्या सुमारास आणि त्यानंतर पुन्हा ७ च्या सुमारास असे दोनवेळा भूकंपाचे धक्के जाणवले. सरकारने यासंदर्भात लक्ष पुरवून याची कारणे शोधणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
तज्ज्ञांच्या मदतीने सातत्याने अनुभवायास मिळत असलेल्या भूकंपाची कारणे शोधावी, आणि याची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती मूळवाड ग्रामस्थ करीत आहेत.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी बलराम लमाणी प्रतिक्रिया देताना म्हणाले, या आठवड्यात तद्न्य या भागात भेटीसाठी येणार आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने भूकंपासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे. मूळवाड, मसुती, मलघाण आणि इतर ठिकाणांची दहा जणांच्या तद्न्य पथकामार्फत पाहणी करण्यात येणार असून भूकंपासंदर्भात अभ्यास करून भूगर्भशास्त्रज्ञांना पाचारण करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच खान आणि भूविज्ञान विभागालाही पत्र लिहिण्यात आले आहे, असे बलराम लमाणी यांनी सांगितले.


Recent Comments