मानवी मूल्यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च त्याग केलेल्या विश्वगुरू बसवेश्वरांनी जगाला समानतेचा संदेश दिला असे विचार बैलूरच्या निष्कल मंडपाचे श्री निजगुणानंद महास्वामी यांनी मांडले.

बैलहोंगल तालुक्यातील गिरियाल केबी गावात लिंगायत धर्म संस्थापक विश्वगुरू बसवेश्वरांच्या ब्रॉन्झच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा निष्कल मंडपाचे श्री निजगुणानंद महास्वामी आणि नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या सान्निध्यात पार पडला. याप्रसंगी गावात उत्सवाचे वातावरण पसरले होते.
त्यानंतर झालेल्या समारंभात बोलताना निष्कल मंडपाचे श्री निजगुणानंद महास्वामी म्हणाले, बसवण्णा यांनी केलेला त्याग हा वेगळाच त्याग आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाला माणसासारखी वागणूक द्यावी म्हणून त्यांनी त्याग केला असे ते म्हणाले.
लिंगायत नेते शंकर गुडुस म्हणाले, केवळ बसवेश्वरांचा पुतळा उभारल्याने जबाबदारी संपली आहे होत नाही. उलट खरी सुरवात आता झाली आहे. त्यांचे विचार अमलात आणून जगण्याची सुरवात केली पाहिजे. बसवण्णा हे केवळ लिंगायतांचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आहेत.
याप्रसंगी आ. महांतेश दौड्डगौडर, माजी जिप सदस्या रोहिणी पाटील, लिंगायत नेते अडीवेश इटगी, संजय भावी, बसवराज रोट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments