चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथे नवरात्रौत्सवानिमित्त काढलेल्या दुर्गामाता दौडमध्ये धर्मादाय, वक्फ आणि हज खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

होय, देश आणि धर्माच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी आणि युवापिढीत नवचैतन्य जागविण्यासाठी दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी नवरात्रात दुर्गामाता दौड काढण्यात येते. यंदाही सर्वत्र ही दौड काढण्यात येत आहे. शनिवारी एकसंबा येथे काढलेल्या दुर्गामाता दौडमध्ये धर्मादाय, वक्फ आणि हज खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी भाग घेऊन युवावर्गाचा उत्साह वाढविला.
यावेळी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, नवरात्रौत्सवानिमित्त उत्तर कर्नाटकात दुर्गामाता दौड काढण्यात येते हे येथील वैशिष्ट्य आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने हा उपक्रम सुरु झाला आहे. दुर्गामातेच्या आशीर्वादाने सर्वत्र सुख, शांती, समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. सर्वांसोबत धावत दौड पूर्ण करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


Recent Comments