बेळगावातील हिरा टॉकीजजवळ भरवण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर मार्केट पोलिसांनी छापा मारून ८ जणांना बेड्या ठोकल्या. त्याशिवाय जुगारात लावलेले ८५,८९० रुपये जप्त केले.

होय, बेळगाव पोलिसांनी मटका-जुगाराविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत हिरा टॉकीजजवळ सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत जुगाराचा अड्डा भरवण्यात आल्याची माहिती मार्केट पोलिअन मिळाली होती. त्यावरून सापळा रचून पोलिसांनी छापा मारला.
यावेळी ८ जुगाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ९ मोबाईल आणि जुगारात लावलेले ८५,८९० रुपये जप्त केले. मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हावण्णावर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली. कोर्टाने आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मार्केट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Recent Comments