Belagavi

चलवादी समाज विकास महामंडळ स्थापन करा : दलित पँथर्स, चलवादी महासभा

Share

चलवादी समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद करावी, नेहरू ओलेकर आणि जारकीहोळी कुटुंबाला मंत्रिपद द्यावे अशा मागण्या भारतीय दलित पँथर्स आणि चलवादी महासभेने मुख्यमंत्र्यांकडे केल्या  आहेत.

बेळगावात शनिवारी या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय दलित पँथर्सचे जिल्हाध्यक्ष डॉ. महानिंगप्पा कोलकार म्हणाले, सरकारने चलवादी समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे आणि त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद करावी, हावेरीचे आ. नेहरू ओलेकर आणि जारकीहोळी कुटुंबाला मंत्रिपद द्यावे अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

जारकीहोळी कुटुंबाकडून आमच्या समाजाच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न कऱण्यात आले आहेत. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी भालचंद्र जारकीहोळी याना मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली. यावेळी भारतीय दलित पँथर्स आणि चलवादी महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Tags: