Hukkeri

गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला अटक

Share

शेतात अवैधरित्या गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी बी. के. गावात घडली.

शिरहट्टी बी. के. गावातील शेतकरी काशीमसाब अम्मनगी याने आपल्या सर्व्हे नं. २२९ या शेतजमिनीत उसाच्या फडात बेकायदेशीररीत्या गांजाची रोपे लावली होती. पिकवलेला गन्ज विकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने शेतात गांजा पिकवल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २४ हजार रु किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. त्याच्यावर एनडीपीसी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीपीआय रमेश छायागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सिद्रामप्पा उन्नद यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी तहसीलदार संतोष हिरेमठ, एएसआय रमेश उप्पार आणि पोलीस पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

Tags: