Ramdurg

सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष; हजारो क्विंटल तूरडाळीचा साठा किडून खराब

Share

 सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लाखो रुपये किंमतीचा हजारो क्विंटल तूरडाळीचा साठा किडून खराब झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ गावात उघडकीस आली आहे

कर्नाटक सरकारने २० महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून हमीभाव योजनेतून खरेदी केलेली ८६ हजार  पोटी तूरडाळ कीड लागल्याने खराब झाली आहे. सरकारने खरेदी केलेला तूरडाळीच्या हा साठा रामदुर्ग तालुक्यातील कटकोळ येथील गोदामांमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. मात्र गोदामांची आणि तूरडाळीच्या साठ्याची योग्य देखभाल, निगा न राखल्याने तुरीला ठेवलेल्या ठिकाणीच कीड लागून संपूर्ण साठा सडून खराब झाला आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सरकार आणि अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लाखो-करोडो रुपयांचा तुरीचा साठा सडल्याने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्यासारखे झाले आहे.

 

Tags: