Belagavi

बी. के. मॉडेलमध्ये एनटीएसइवर मार्गदर्शन

Share

बेळगावातील बी. के. मॉडेल हायस्कुलमध्ये शनिवारी दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एनटीएसइसंदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बी. के. मॉडेल विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि अर्थकोटा करिअर अकादमीतर्फे शनिवारी दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एनटीएसइसंदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ तिगडी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना शिक्षणतज्ज्ञ तिगडी म्हणाले, मुलांना त्यांच्या भविष्यात उपयुक्त ठरेल असे शिक्षण देण्याची आज गरज आहे. देशात नवे शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे. आणखी दोनेक वर्षात त्याची देशभर अमलबजावणी होईल. त्यामुळे आतापासूनच मुलांना त्याला पूरक ठरेल असे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मुलांना वाचनाची आवड लावण्यासोबतच त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल असे शिक्षण, प्रशिक्षण त्यांना दिले पाहिजे. तरच स्पर्धात्मक जगात त्यांचा निभाव लागू शकेल असे तिगडी यांनी सांगितले.

याप्रसंगी शिक्षण खात्याचे अधिकारी रिझवान यांनीही मार्गदर्शन केले. बेळगाव जिल्हा शिक्षण संस्थेचे संचालक अविनाश पोतदार, अर्थकोटा करिअर अकादमीचे अमित मिठारी, अमित जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

 

Tags: