देवदासी आणि त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह करत कुष्टगी येथील विमुक्त देवदासी महिला मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

कुष्टगी येथील विमुक्त देवदासी महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी समान विचारसरणी दलित संघटना, पुरोगामी संघटना, कायद्याचे पालन करणाऱ्या संघ संस्था आणि मानव हक्क रक्षण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या जागृती – प्रबोधन यात्रेचे आज बेळगावमध्ये आगमन झाले. यावेळी देवदासी पद्धतीचे निर्मूलन आणि त्यांचे पुनर्वसन कारण्यासंदर्भांत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
देवदासी पद्धतीचे संपूर्ण निर्मूलन व्हावे आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासंदर्भात राज्यसरकारने सर्वसमावेशक कायदा लागू करावा अशी मागणी करत कुष्टगी येथील विमुक्त देवदासी महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या जागृती – प्रबोधन यात्रेचे आज बेळगावमध्ये आगमन झाले. निवेदन सादर केल्यानंतर स्पंदन या स्वयंसेवी संस्थेच्या सुशीला यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. देवदासी आणि त्यांच्या मुलांना घटनात्मक आदर, हक्क आणि सुरक्षा मिळवून देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. याचप्रमाणे देवदासी पद्धती निर्मूलन आणि पुनर्वसनसंदर्भातील २०१८ सालचे बिल पास करण्यात यावे. तसेच देवदासी महिला आणि त्यांच्या मुलांना सरकारने सर्व सुविधा पुरवाव्यात. नव्या सुविधा पुरविण्यात याव्यात. मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सरकारने प्रयत्नशील होऊन, त्यांच्या शिक्षण, उद्योगाची सोय करण्यात यावी, असा आग्रह सुशीला यांनी केला. यावेळी रेणुका पत्तार, केम्पव्वा सोंटन्नावर इसजेके बेळगावी, के. मरगन्नावार यांच्यासह इतर उपस्थित होते.


Recent Comments