बडालअंकलगी येथे घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांची खा. मंगल अंगडी यांनी शुक्रवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दोनच दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे बडालअंकलगी येथे घराची भिंत कोसळून खनगावी कुटुंबातील ६ जणांचा आणि त्यांच्या समोरच्या घरातील एका बालिकेचा मिळून एकूण ७ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी पाचजण जागीच ठार झाले होते तर दोघांचा इस्पितळात उपचारांसाठी नेताना मृत्यू झाला होता.

बेळगावच्या खा. खा. मंगल अंगडी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेने मला अतीव दुःख झाले आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती देव तुम्हाला देवो अशा शब्दांत त्यांनी दुःखी कुटुंबाला धीर दिला.
यावेळी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव हेही उपस्थित होते. त्यांनीही पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.
Recent Comments