Belagavi

राज्यातील सरकारी कार्यालयांवर कन्नड ध्वज लावा : भीमाप्पा गडाद यांची मागणी

Share

राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वजासहित कर्नाटक राज्याचा ध्वज येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत लावण्यात यावा, अन्यथा २६ ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी दिलाय.

यासंदर्भात बोलताना भीमाप्पा गडाद म्हणाले, राज्यात प्रत्येक कार्यालयाच्या इमारतीवर कर्नाटकाचा ध्वज फडकविण्यासंदर्भात अधिकृत आदेश जाहीर करावा, यासाठी २४ नोव्हेंबर २०१४ पासून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सरकारने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. यामुळे राज्यातील कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रध्वजाप्रमाणेच कन्नड ध्वज देखील फडकविण्यासाठी आम्ही निवेदन दिले असून यासंदर्भात ८ ऑक्टोबर २०१५ रोजी ऍडव्होकेट जनरल यांनी ध्वज फडकविल्यास कोणतीही कायदेशीर अडचण येणार नसल्याचे स्पशर केले आहे. यामुळे येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत सर्व सरकारी कार्यालयांवर कन्नड ध्वज फडकवावा, अन्यथा २६ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व कन्नड संघटना धरणे आंदोलन छेडतील, असे गडाद म्हणाले.

याचप्रमाणे बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोरील कन्नड ध्वज महाराष्ट्र एकीकरण समितीने हटविला आहे, १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पळून कन्नडिगांच्या भावना दुखविण्याचा येतात, समितीवर कायदेशीर कारवाई व्हावी, असेही भीमाप्पा गडाद म्हणाले.

यासंदर्भातील निवेदन भीमाप्पा गडाद यांनी दिले असून २5 ऑक्टोबर पर्यंत सरकारी कार्यालयावर कन्नड ध्वज फडकविण्यासाठी अधिकृत आदेश जारी करण्यात न आल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Tags: