Khanapur

खानापुरात रस्त्याची तातडीने दुरुस्ती

Share

खानापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोरील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती. याची माहिती मिळताच नगरपंचायतीच्या वतीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली

खानापूर परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे विद्यानगर भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोरील मुख्य रस्ता उखडून मोठा खड्डा पडला होता. रहिवाशांनी ही बाब खानापूर नगरपंचातीच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर तातडीने दखल घेत पंचायत स्थायी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मादार यांनी संबंधितांना या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले.

खानापूर नगरपंचायतीचे अध्यक्ष मजहर खानापूर, स्थायी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मादार, मुख्याधिकारी विवेक बन्नी यांनी स्वतःच्या देखरेखीखाली रस्त्यातील खड्डा भरून दुरुस्त करवून घेतला. त्यामुळे आता या रस्त्यावरून सुरळीत वाहतूक सुरु आहे. या कार्यतत्परतेची नागरिकांतून प्रशंसा करण्यात आली.

 

Tags: