कर्नाटक लॉ सोसायटी संचलित राजा लखमगौडा लॉ कॉलजेमध्ये धर्मादाय पुरस्कार आणि विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मंजुनाथ नारायण भट, मुख्य दिवाणी न्यायाधीश आणि सीजीएम न्यायाधीश यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
एलएलबी पदवीप्राप्त विद्यार्थी कृष्ण बांदोकार यांचा प्रतिष्ठित एम. के. नंबियार सुवर्ण पदकाने गौरव करण्यात आला. भारत सरकारचे ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्यावतीने त्यांची आई आणि संविधान तज्ञ एम. के. नंबियार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एलएलबी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पदक देण्यात येते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments