निपाणी विधानसभा क्षेत्राच्या व्याप्तीतील यमगर्णी गावात जेजेएम कामकाजाचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्याहस्ते झाला.

निपाणी विधानसभा क्षेत्राच्या व्याप्तीतील यमगर्णी गावात ग्रामीण पेयजल पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या ३६ लाख रुपयांच्या खर्चातून घरोघरी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा म्हणजेच जेजेएम या योजनेंतर्गत कामकाजाचा शुभारंभ हज आणि वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी या कार्यक्रमात उद्देशून बोलताना शशिकला जोल्ले म्हणाल्या विकास कामांसह जनतेचे हित जपण्याची जबाबदारी माझी आहे. जनतेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. उच्च दर्जाचे काम त्वरित पूर्ण करून, हि सुविधा उपलब्ध करून द्यावी. पुढील काही दिवसात निपाणी क्षेत्रातील जनतेने केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. या मतदार क्षेत्रात विकासकामे निरंतर सुरु राहतील, असा विश्वास शशिकला जोल्ले यांनी दिला.
यावेळी यमगर्णी गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नेते आणि ग्रामस्थ तसेच अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments