बेळगावातील एसीपीआरचे सचिव आणि भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी संपादित केलेल्या ‘प्रा. एन. आर. देशपांडे एन एक्सपोनंन्ट ऑफ हीज मास्टर्स व्हिजन‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

बेळगावातील हिंदवाडीतील एसीपीआरच्या श्री गुरुदेव रानडे मंदिरात आयोजित कार्यक्रमात ‘प्रा. एन. आर. देशपांडे एन एक्सपोनंन्ट ऑफ हीज मास्टर्स व्हिजन’ या ग्रंथाचे प्रकाशन हायकोर्ट न्या. व्ही. श्रीशानंद यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, जीवनात ध्येयप्राप्तीसाठी एक गुरु असावा लागतो. गुरुदेव रानडे यांनी तत्वज्ञानाच्या अभ्यासाला एक नवा आयाम मिळवून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानायला हवेत. गुरुदेवांना समजून घेतल्यास एन. आर. देशपांडे यांनाही समजून घेता येईल. चोहोबाजूने चांगले विचार आमच्याकडे येवोत, हा सनातन संस्कृतीचा विचार एन. आर. देशपांडे यांनी समजावून सांगितला असे ते म्हणाले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रधान जिल्हा व सत्र न्या. चंद्रशेखर जोशी म्हणाले, गुरुदेव रानडे यांच्यासारखा गुरु लाभल्यास आम्हा सर्वांचे जीवन सार्थकी लागेल.
प्रास्ताविकात एसीपीआरचे सचिव ऍड. एम. बी. जिरली म्हणाले, एन. आर. देशपांडे अनेक क्षेत्रांत पारंगत होते. कायद्यांचे उत्तम शिक्षक असलेल्या त्यांनी अनेकांच्या जीवनात प्रकाश आणला. त्यांचे संपूर्ण कुटुंबच गुरुदेवांच्या मार्गावरून वाटचाल करणारे होते. ते माझेही गुरु होते हे माझे भाग्य.
याप्रसंगी कामगार न्यायालयाच्या न्या. बेला एन. नाईक, एसीपीआरचे अध्यक्ष ऍड. अशोक पोतदार, उपाध्यक्ष सुब्रमण्यम भट आदी उपस्थित होते.


Recent Comments