Belagavi

मृत गायीवर हिंदू धर्म परंपरेनुसार विधिवत अंत्यसंस्कार

Share

बेळगाव तालुक्यातील बसवणकोळ्ळ येथे मरण पावलेल्या गायीवर श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी हिंदू धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

बसवणकोळ्ळ येथे एक गाय बेवारस अवस्थेत मरून पडल्याची माहिती श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावर नारू निलजकर, विजय बोजगार, भरत नागरोळी, कार्तिक देवर, अरिकराज आदींनी त्या गायीला शहापूर स्मशानभूमीत आणून तिच्यावर हिंदू धर्म परंपरेनुसार विधिवत अंत्यसंस्कार केले. राहुल किल्लेदार, राहुल आवळे, रोहन भोसले, रोहन आर. एन. आदींनी या कार्यात सहभाग घेतला.

 

 

Tags: