Belagavi

माजी आ. संजय पाटील यांच्या निषेधार्थ दलित संघटनांची निदर्शने

Share

बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अवमानास्पद विधान केलेल्या माजी आ. संजय पाटील यांच्या निषेधार्थ बेळगावात बुधवारी विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. यावेळी संजय पाटील यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
होय, बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अवमानास्पद विधान माजी आ. संजय पाटील यांच्या विरोधात आता व्यापक आंदोलने होत आहेत. बुधवारी बेळगावात विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संजय पाटील यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर संजय पाटील यांचा पुतळा जाळण्यात आला. महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी संजय पाटील यांच्या प्रतिमेला चपलांनी बडवले.

यावेळी संजय पाटील यांची प्रतिकृती जाळण्यास पुढे सरसावलेले दलित निदर्शक आणि पोलिसांमध्ये झटपट झाली. पोलिसांनी आग विझवून प्रतिकृती ताब्यात घेतली.
यावेळी बोलताना दलित संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शशी साळवे म्हणाले, संजय पाटील याना या देशाचा इतिहासच माहित नाही. महिलेचा अवमान झाल्याने या देशात रामायण-महाभारत घडले आहे. आपल्या देशात महिलेला देवीचे पवित्र स्थान दिलेले आहे. हे माहित नसताना महिला लोकप्रतिनिधींबद्दल अवमानास्पद विधान करणाऱ्या संजय पाटील यांची भाजपने हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना अन्य दलित नेत्यांनी सांगितले की, देशात आज महिला आणि दलित असुरक्षित आहेत. संजय पाटील यांच्या विधानाने ५०० वर्षांपूर्वीचा मनुवाद आता पुन्हा जिवंत केल्यासारखे झाले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे संजय पाटील यांचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधातले विधान आहे. त्यामुळे भाजपने संजय पाटील याना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी केली. बाईट या निदर्शनात शहरातील अनेक दलित आणि महिला संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी भाग घेतला.

Tags: