बेळगावातील रामतीर्थ नगरजवळील विनायक कॉलनीतील उद्यानात आपट्याची रोपे लावून नवरात्रोत्सवाला अनोख्या पद्धतीने प्रारंभ करण्यात आला.

होय, विनायक कॉलनीतील रहिवाशांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाची सुरवात अनोख्या पद्धतीने केली. कॉलनीतील उद्यानात आपट्याची रोपे लावून सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षणाचा उपक्रमही त्यांनी राबविला. यावेळी प्रमुख पाहुणे नूतन नगरसेवक हणमंत कोंगाली, सर्वलोक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ, माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील उपस्थित होते. यांच्याहस्ते आपट्याची रोपे उद्यानात लावण्यात आली.
यावेळी बोलताना नगरसेवक हणमंत कोंगाली म्हणाले, विनायक कॉलनीतील रहिवाशांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाची सुरवात उद्यानात आपट्याची रोपे लावून अनोख्या पद्धतीने केली याचा मला विशेष आनंद होत आहे. पालिकेतर्फे या उद्यानात माळी नेमून त्याची चांगली देखभाल करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विनायक कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते.


Recent Comments