वडगाव,शहापूर,जूनेबेळगाव,अनगोळ,येळ्ळूर,धामणेसह परिसरात राजहंसगडचे जाग्रूत दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सिध्देश्वर देवास रयत गल्ली, वडगावमधील शेतकरी तसेच गल्लीतील सर्वांनी मीळून भाद्रपद महिन्यातील सोमवारी अभिषेक व नंतर प्रसादचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात शहापूर,वडगाव,जूनेबेळगाव,येळ्ळूर,अनगोळ तसेच परिसरतील शेतकऱ्यांनीही मोठ्या संखेने भाग घेतला होता.या देवावर शेतकऱ्यांची अपार श्रध्दा आहे.कारण पिढ्यादरपिढ्या परिसरातील शेतकरी दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहात शेतकरी अभिषेक,महाप्रसाद करत होते.पण अलिकडे त्यात खंड पडल्याने रयत गल्लीत बहुसंख्य शेतकरी असल्याने एका गल्लीची जवळपास 150 एकर शेती असल्याने शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन परंपरागत चालत आलेल्या कार्यक्रमात खंडपडूनदेता तसेच परिसरातील शेतकऱ्यांची खरिप तसेच रब्बी पीकं व शेतकरी कुटूंब सुखी ठेवत येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पीकाऊ शेतीतून बेकायदेशीर होणारा हालगा-मच्छे बायपास रद्द होऊन शेतकरी वाचवावा म्हणून श्री सिध्देश्वरास साकडे घालत अभिषेक व प्रसादाचे आयोजन केले होते.परिसरातील शेतकरी व भक्तांनी मोठ्या संखेने प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी रयत गल्लीतील शेतकरी, महिला,युवाकार्यकर्त्यानी सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी बरेच परिश्रम घेतले.


Recent Comments