Belagavi

व्हीटीयूच्या विध्यार्थ्यांना खुशखबर ! यंदापासून ओपन बुक परीक्षा पद्धती

Share

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने या शैक्षणिक वर्षांपासून ठराविक बी. . अभ्यासक्रमांसाठी ओपन बुक परीक्षा पद्धती अवलंबण्याचे ठरविले आहे.

 

होय, व्हीटीयूच्या विध्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि आर्किटेक्चर या डिझाईन आधारित बीई अभ्यासक्रमांसाठी ओपन बुक परीक्षा पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या अभ्यासक्रमांना ही पद्धत लागू करता येईल याचा सल्ला देण्याची सूचना व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. डॉ. करिसिद्दप्पा यांनी बोर्ड ऑफ स्टडीजला केली आहे. बोर्ड ऑफ स्टडीजचा अहवाल आल्यानंतर याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. अभियांत्रिकीच्या सर्वच अभ्यासक्रमांसाठी ओपन बुक परीक्षा पद्धती लागू करता येत नाही. अभियांत्रिकीच्या काही विशिष्ट अभ्यासक्रमांमध्ये विध्यार्थ्यांना आकृत्या, डिझाईन काढाव्या लागतात. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सारख्या अभ्यासक्रमांत विध्यार्थ्यांना स्ट्रक्चर बेस्ड डिझाईन, एलिमेंट नेसद डिझाईन काढावे लागते. त्या विध्यार्थ्यांना रेफरन्ससाठी बीएस कोड आणि हँडबुक देण्यात येईल. ओपन बुक परीक्षा पद्धती अवलंबल्यानंतर शिक्षकांना विध्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रश्न विचारण्यास सांगण्यात येईल. त्यांची उत्तरे देण्यासाठी विध्यार्थ्यांना बीएस कोड आणि हँडबुकचा वापर करता येईल. या पद्धतीमुळे  विध्यार्थ्यांना विषयाची संकल्पना समजून घेण्यास मदत होणार असल्याचे विषयतज्ञांचे मत आहे. सध्या देशात इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ओपन बुक परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जातो. कर्नाटकात प्रथमच सरकारी विद्यापीठाकडून हा प्रयोग करण्यात येत आहे.

 

Tags: