Belagavi

बेळगावात यंदाही निघणार नाही ईद-ए-मिलादची मिरवणूक

Share

कोविडचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे कोविड मार्गसूचीच्या दंडकानुसार यंदाही बेळगावात ईदमिलादची मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात येणार नाही असे मार्केट उपविभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी स्पष्ट केले.

बेळगावात मंगळवारी मार्केट पोलीस ठाण्यात ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलताना एसीपी सदाशिव कट्टीमनी म्हणाले, यावेळी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात येणार नाही. याबाबत सरकारने काही आदेश जारी केलेला नाही. येत्या काही दिवसात जर आदेश जारी केला तर त्याबाबत कळविण्यात येईल. मुस्लिम समाजातील ज्येष्ठांनी याबाबत युवकांना समजावून सांगावे असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला एसीपी चंद्रप्पा, सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगेरी, सिरत कमिटीचे अध्यक्ष अक्सर बागवान, वक्फ बोर्डाचे चेअरमन गफूर घीवाले, अंजुमन इस्लाम संस्थेचे पदाधिकारी, मुस्लिम समाजाचे नेते उपस्थित होते.

Tags: