अथणी शहरातील चर्मालय कॉलनीतील सीसी रस्त्याच्या कामकाजाचा शुभारंभ आमदार महेश कुमठळ्ळी यांच्याहस्ते करण्यात आला.

अथणी शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार महेश कुमठळ्ळी यांच्याहस्ते पार पडला.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार कुमठळ्ळी म्हणाले, अथणी तालुक्यात अनेक विकासकामांसाठी अनुदान मिळाले असून यामधून अथणी ग्रामीण भागात पाच लाखांच्या खर्चातून परमानंद कुटीर समुदाय भवन, ४३ लाख रुपयांच्या खर्चातून स्लॅम चर्मालाय सीसी मार्ग, चरंडी आणि बळवाड गावात सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे तीन खोल्या तसेच शिरीहट्टी गावात २७ लाख रुपयांच्या खर्चातून उच्च प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या बांधण्यात येणार आहेत. या कार्याचा शुभारंभ आज भूमिपूजनाने करण्यात आला आहे.
यावेळी आमदार कुमठळ्ळी यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कालावधीत केलेल्या विकासकामांना लक्षात घेऊन पुढील निवडणूक देखील आपण बहुमताने जिंकण्याचा विश्वास आमदार कुमठळ्ळी यांनी व्यक्त केला.
यावेळी झोपडपट्टी विकास मंडळाचे अधिकारी, कार्यकारी संचालक शंभूलिंगाप्पा,आणि कार्यकारी अधिकारी फणिराज, निंगाप्पा नंदेश्वर, शिवू दिवानमळ, श्रीशैल नायक, शशी साळवी, महांतेश बाडगी, अरुण बासिंगी, सुंदर सौदागर, दिलीप कांबळे यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments