मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अखेर बेळगावात उसविकास आणि साखर संचालनालयाच्या कार्यारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रारंभिक टप्प्यात कामकाजाला सुरवात झाली.

होय, उत्तर कर्नाटकातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. बेळगावातील गणेशपूरमधील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेत उसविकास आणि साखर संचालनालय थाटण्यात आले आहे. साखर आयुक्त शिवानंद कलकेरी येथे रुजू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी, कन्नड संघटनांच्या कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक चंदरगी यांच्यासह अनेकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच साखर आयुक्तांशी सौहार्दपूर्ण चर्चा करण्यात आली. 
यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शेतकरी नेते सिदगौडा मोदगी म्हणाले, उत्तर कर्नाटकाच्या शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार अखेर बेळगावात उसविकास आणि साखर संचालनालय सुरु झाले आहे. आमच्या सगळ्यांच्या लढ्याची दखल घेऊन मुख्यमंत्री बोम्मई यांनी हे कार्यालय येथे सुरु करण्याचा आदेश दिला आहे. २ दिवसांत कार्यालयाचे नियमित कामकाज पूर्णपणे सुरु होणार आहे. त्यावेळी पुन्हा येऊन अधिकाऱ्यांना मिठाई वाटून शुभेच्छा देणार आहोत असे सांगितले.
एकंदर अनेक वर्षांच्या शेतकऱ्यांच्या मागणीवरून बेळगावात उसविकास आणि साखर संचालनालय सुरु झाले आहे. त्याचा येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना लाभ झाला तर यामागचा उद्देश सार्थकी लागणार आहे.


Recent Comments