Belagavi

संगीतामुळे जीवनातील ताणतणाव कमी होण्यास मदत : रंगकर्मी बी. एस. गविमठ

Share

संगीताशिवाय जीवन हे व्यर्थ आहे. संगीतामुळे जीवनातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते असे विचार कन्नड रंगकर्मी बी. एस. गविमठ यांनी व्यक्त केले.

बेळगावातील लक्ष्मी टेकडी येथील महिला अभिवृद्धी आणि सेवा संस्थेच्या ‘तारादेवी चंदरगी गुरुकुल’ या संगीत शाळेचे शनिवारी सायंकाळी उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, संगीतशाळा चालवणे आज कठीण झाले आहे. ७ लाख लोकसंख्येच्या बेळगाव शहरात अवघ्या ६-७ संगीतशाळा आहेत. संगीत शिकण्याची इच्छा असणारे अनेक लोक आहेत. मात्र त्यांना सोयीच्या ठिकाणी संगीतशाळा नाहीत. संगीताची महिमा अपार आहे. त्याच्यामुळे शेतातील पिकेही जोमदारपणे वाढतात आणि गोधनही अधिक दूध देते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे असे गविमठ यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर बागेवाडी, एस. बी. साबने, वाय. बी. बडसकर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना संस्थेचे संचालक अशोक चंदरगी म्हणाले, राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ४ संगीत परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार या गुरुकुलात शास्त्रीय, सुगम संगीत, तबला आणि हार्मोनियम वादनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढे नृत्य, नाट्य प्रशिक्षणही देण्याचा मानस आहे असे सांगितले. संगीत शाळेचे प्रमुख सुरेश चंदरगी यांनी प्रारंभी प्रार्थना सादर केली. संस्थेच्या संचालिका अश्विनी करीगोन्नवर-चंदरगी आणि मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Tags: