Belagavi

रिया इन्फोटेकमध्ये गांधी-शास्त्री जयंती

Share

 बेळगावातील रिया इन्फोटेकमध्ये महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम बेळगावातील रिया इन्फोटेकमध्ये पार पडला. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमान पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ४५ दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना ह्यूमॅनिटी सर्व्हिसचे अध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, रिया इन्फोटेकमध्ये सर्वप्रथम तृतीयपंथीयांना सर्वांसोबत शिकण्याची संधी देऊन, प्रमाणपत्रे प्रदान करून चांगला पायंडा पाडला आहे.

त्याला चांगला प्रतिसादही लाभला आहे. तृतीयपंथीयांना ४५ दिवसांचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या रिया इन्फोटेकच्या संचालिका लीना टोपन्नावर यांचे हे कार्य प्रशंसनीय आहे. रिया इन्फोटेकच्या संचालिका लीना टोपन्नावर म्हणाल्या, हे केवळ कौशल्य कर्नाटक प्रशिक्षण नसून, तृतीयपंथीयांना समाजात समान संधी दिली आहे.  यावेळी रिया इन्फोटेकचे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

 

Tags: