बेळगावात रविवारी गंगामतस्थ समाजाची जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली. या सभेत समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

कन्नड साहित्य भवनात पार पडलेल्या गंगामतस्थ समाजाच्या जिल्हास्तरीय सभेत समाजाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून ५ पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणीवर नेमण्याचे ठरविण्यात आले. समाजाच्या समस्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेले विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वानी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. समाजातील गरिबांच्या उत्थानासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. यावेळी समाजातर्फे साबण्णा तळवार यांचा सत्कार करण्यात आला. या सभेबाबत बसवराज सुनगार यांनी अधिक माहिती दिली. या सभेला मल्लप्पा मुरगोड, राजू जमखंडीकर, अशोक वालीकार, डॉ. व्ही. डी. डांगे, पी. जयश्री, अण्णासाहेब सनदी, दिलीप कुरुंदवाडे आदी उपस्थित होते.


Recent Comments