Belagavi

अन पोलिसांनी हातात घेतला झाडू !

Share

पोलीस म्हटले की अंगात खाकी गणवेश, हातात काठी असे चित्र नजरेसमोर येते. पण बेळगावात आज वेगळेच चित्र दिसले. हातात काठीऐवजी झाडू घेऊन पोलीस स्वच्छता करताना आढळून आल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. गांधी जयंतीनिमित्त पोलिसांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली.

होय, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी बेळगावात पोलीस खात्यातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आपापले पोलीस ठाणे आणि त्याचा पिरसर पोलिसांनी हाती झाडू घेऊन स्वच्छ केला. मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पोलीस ठाण्यापासून ते सर्किट हाऊसपर्यंतच्या परिसरात रस्त्याकडे पडलेला कचरा, झाडांची पाने गोळा करून परिसर स्वच्छ केला.  याचप्रमाणे बेळगावातील कॅम्प, बेळगाव बाहेरील मारिहाळ आणि हिरेबागेवाडी पोलिसांनीही आपापल्या पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून खऱ्या अर्थाने गांधी जयंती साजरी केली. नागरिकांनीही पोलिसांच्या या स्वच्छता मोहिमेची प्रशंसा केली.

 

Tags: