Politics

सांगा सिद्रामय्या, आंबेडकरांनी का राजीनामा दिला होता?

Share

तत्कालीन काँग्रेस मंत्रिमंडळातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला हे सिद्रामय्या यांनी आधी सांगावे, मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री ए. नारायणस्वामी यांनी सिद्रामय्यांची खिल्ली उडवली.
शनिवारी बेळगावातील संगमेश्वर नगरातील बाबू जगजीवनराम उद्यानाजवळील समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात गांधी जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सिद्रामय्या हे मूळचे जनता परिवारातून आलेले आहेत. त्यांना काँग्रेसबाबत काय माहिती असणार? ते केवळ अधिकार आणि खुर्चीसाठी काँग्रेसमध्ये आले आहेत.

तत्कालीन केंद्रीय मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना त्यांनी महिला लोकप्रतिनिधी कायद्यांचा मसुदा मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काँग्रेसमधूनच विरोध झाला होता. आंबेडकरांच्या प्रयत्नांना विरोध करून त्यांचा राजीनामा घेणारा पक्ष काँग्रेस आहे. हे सिद्रामय्या यांनी संपूर्ण देशाला सांगणे योग्य ठरेल असे नारायणस्वामी म्हणाले.

 

Tags: