Khanapur

भंडाऱ्याच्या उधळणीत थिरकल्या डॉ. अंजली निंबाळकर !

Share

कुठे फळ तिकडे नुसता भंडारा, भांडाराच्या उधळणीत सगळे न्हाऊन गेलेले. त्यात भंडाऱ्याची उधळण करत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांवर थिरकत जय शिवाजी, जय भवानी असा जयघोष करत युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या या आहेत आपल्या खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर !

होय दरवर्षी प्रमाणे खानापूर तालुक्यातील चिक्कदिनकोप्प गावात ग्रामदेवतेची ओटी भरण्याचा कार्यक्रम भंडाऱ्याच्या उधळणीत जल्लोषात पार पडला. यावेळी आ. अंजली निंबाळकर यांनी भक्तिभावाने देवीची ओटी भरून आशीर्वाद घेतले. ग्रामस्थांबरोबर भंडाऱ्याच्या उधळणीत युवकांना प्रोत्साहन देत जय शिवाजी, जय भवानी असा जयघोष केला. महिलांकडून भंडारा लावून घेत शिवाजी महाराजांच्या गाण्यांवर थिरकण्याचा आनंदही त्यांनी घेतला.

 

Tags: