महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त बेळगावात लायन्स क्लबतर्फे शनिवारी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

लायन्स क्लबच्या सदस्यांनी शनिवारी बेळगावातील गोवावेस येथील बसवेश्वर उद्यानात स्वच्छता मोहीम राबवली. या अंतर्गत उद्यानातील संत बसवेश्वरांच्या पुतळ्याची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे शेजारील बसथांब्याचीही सफाई करण्यात आली. डॉ. नागराज मरेन्नावर, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास अरळीकट्टी, प्रकाश हेगनायक, सतीश पाटील, ऍड. भास्कर पाटील, ऍड. यशोदा पाटील यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी वार्ड क्र. २९चे नगरसेवक नितीन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.


Recent Comments