त्यागवीर शिरसंगी देसाई यांचे नाव अजरामर रहावे या उद्देशाने बेळगावातील कॉलेज रोडचे त्यागवीर शिरसंगी देसाई कॉलेज रोड असे शनिवारी नामकरण करण्यात आले.

होय शनिवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके, विधानपरिषदेतील सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी संयुक्तपणे कॉलेज रोडचे त्यागवीर शिरसंगी देसाई कॉलेज रोड असे नामकरण करून त्याचे लोकार्पण केले. 
यावेळी बोलताना प्रभाकर कोरे म्हणाले, अथणीच्या शिवयोगी स्वामीजींनी शिरसंगी देसाई यांना, ‘तुम्हाला मुले होणार नाहीत, सगळं समाजच तुम्ही दत्तक घ्या’ असा सल्ला दिला होता. त्यावरून लिंगराज देसाई यांनी आपली सगळी संपत्ती समाजाला दान करून टाकली. डी. सी. पावटे यांच्यासह अनेकांनी शिरसंगी ट्रस्टच्या मदतीच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आपली व समाजाची प्रगती साधली. देशात एवढा मोठा त्याग केलेली दुसरी व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही असे कोरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी, प्रभाकर कोरे यांच्या विनंतीनुसार कॉलेज रोडचे महानगरपालिकेतर्फे अधिकृतरीत्या त्यागवीर शिरसंगी देसाई कॉलेज रोड असे नामकरण करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, केएलई संस्थेचे सचिव बी. जी. देसाई, संयुक्त सचिव सुनील जलालपुरे, आजीव सदस्य प्रकाश कडकोळ, महादेव बळीगार यांच्यासह अधिकारी, केएलई संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments